शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, मुख्यमंत्री शिंदे यांचा इशारा

मुंबई, 19 जुलै: (विश्वजीत खाटमोडे)समाजातील विविध घटकांसाठी राज्य सरकारने लागू केलेल्या सात योजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पार पडली. या बैठकीला मुख्य सचिवांसह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. तसेच यावेळी विभागीय आयुक्त, संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हास्तरीय विविध यंत्रणांचे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

https://x.com/CMOMaharashtra/status/1813990406717051224?s=19

गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही

राज्य सरकार गोरगरीब, सर्वसामान्यांना लाभ मिळावा, यासाठी योजना राबवत असते. अशा घटकांकडून पैसे काढणे हे योग्य नाही त्यामुळे योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत दिला. योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घ्या. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांनी यासाठी दक्ष राहिले पाहिजे. योजनांच्या अंमलबजावणीचे उद्दिष्ट साध्य करताना लाभार्थ्यांची नोंदणी करताना काही घटक गैरप्रकार करत असतील, ते वेळीच रोखले पाहिजे. असे मुख्यमंत्री म्हणाले.

अशांना तुरूंगात टाका

तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कोणीही महिला भगिनींकडून अर्जासाठी पैशांची मागणी केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करा. अशांना केवळ निलंबित करू नका, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याला तुरूंगात पाठवा. या योजनेत भगिनींना कुणीही नाडता कामा नये, याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवले पाहिजे. या नोंदणीचा सातत्याने आढावा घेतला जाणे आवश्यक आहे, असेही निर्देश यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.


महत्वाच्या अशा या सर्वच योजनांमध्ये केवळ शासकीय केंद्रावर भरले जाणारे अर्जच पडताळणीसाठी ग्राह्य धरले जातील अशा सूचना देण्यात याव्यात. अधिकृत अशा केंद्रावरच अर्ज भरले जातील, असे प्रय़त्न केले जावेत. खासगीरित्या आणि अन्य कुठल्यापद्धतीने कुणी अर्ज भरत असतील, त्यांना वेळीच रोखण्यात यावे, अशा सूचनाही या बैठकीतून देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *