पूजा खेडकर यांच्या आईला अटक, पुणे पोलिसांची कारवाई

महाड, 18 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना आता पोलिसांनी अटक केली आहे. एका शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून धमकवल्याप्रकरणी पोलिसांनी पूजा खेडकरच्या आईला ताब्यात घेतले आहे. रायगड जिल्ह्यातील महाडमधील एका हॉटेलममधून त्यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी आज दिली आहे.

https://x.com/ANI/status/1813809986356773106?s=19

पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

काही दिवसांपूर्वी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत मनोरमा खेडकर या हातात बंदूक घेऊन लोकांना धमकावत असल्याचे दिसून आले होते. याप्रकरणी, एका शेतकऱ्याने पौड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांच्यासह 5 जणांच्या विरोधात पुण्यातील पौड पोलीस ठाण्यात कलम 323, 504, 506 अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला होता. त्यानंतर आज सकाळी मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध बंदुक बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे.

व्हिडिओ व्हायरल झाला होता

तत्पूर्वी, सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत मनोरमा खेडकर या पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावताना दिसत आहे. दरम्यान पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी पुण्यातील मुळशी तालुक्यातील एका गावात जमीन खरेदी केली होती. त्याठिकाणी हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. तसेच याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार, याप्रकरणात पहिली अटक करण्यात आली आहे. सध्या याप्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *