मुंबईत मुसळधार पाऊस, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

मुंबई, 08 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच आज देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून, मुंबईतील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. याशिवाय मुंबईत पडत असलेल्या या मुसळधार पावसामुळे 8 जुलै रोजी सकाळी 11:00 ते दुपारी 2:00 या वेळेत होणाऱ्या सर्व सीडीओईच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षांची नवीन तारीख 13 जुलै रोजी जाहीर केली जाईल, असे मुंबई विद्यापीठाने सांगितले आहे.

https://x.com/mybmc/status/1810137144997892158?s=19

https://x.com/mybmc/status/1810183428962386157?s=19

https://x.com/ANI/status/1810187210341417023?s=19

https://x.com/ANI/status/1810203089774784842?s=19

रेल्वे आणि विमान सेवा विस्कळीत

मुंबईत काल मध्यरात्रीनंतर 1 वाजल्यापासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत या 6 तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. या जोरदार झालेल्या पावसामुळे काही शहरातील विविध सखल भागांमध्ये पाणी साचले. या पावसामुळे उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे. तसेच मुंबई विमानतळावरील अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तत्पूर्वी, आजच्या दिवशी मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबईत आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आहे. तसेच मुंबईत उद्या मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे मुंबईत उद्या येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, याची माहिती हवामान विभागाची संचालक सुनील कांबळे यांनी आज दिली.

https://x.com/ANI/status/1810172662435696831?s=19

गरज असेल तरच घराबाहेर पडा…

दरम्यान, मुंबईतील पावसाच्या परिस्थितीवर मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे सध्या आपत्ती नियंत्रण कक्षातून शहरातील परिस्थितीचे वैयक्तिक निरीक्षण करत आहेत. तसेच आपत्कालीन नियंत्रण कक्षासह आपत्कालीन कर्मचारी आणि अधिकारी मुंबईतील विविध ठिकाणी तैनात असून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. महानगरपालिकेचे सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि इतर यंत्रणा विविध ठिकाणी कार्यरत आहेत, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन देखील महानगरपालिकेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *