सोमेश्वर नगर येथे संत सोपानकाका पालखीचे पहिले गोल रिंगण भक्तीमय वातावरणात संपन्न! रोहित पवारांनी घेतले पालखीचे दर्शन

सोमेश्वर नगर, 06 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) श्री संत सोपानकाका यांच्या पालखीचे पहिले सोहळ्याचे गोल रिंगण आज बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर येथे पार पडले. यावेळी गोल रिंगणातून मानाच्या अश्वांनी तीन फेऱ्या मारल्या. त्यानंतर हा रिंगण सोहळा संपन्न झाला. अशाप्रकारे अभंग आणि टाळ-मृदंगाच्या गजरात तसेच विठू नामाच्या जयघोषात संत सोपानदेव पालखीचे पाहिले अश्व रिंगण पार पडले. हा गोल रिंगण सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने नागरिक सोमेश्वर नगर येथे आले होते. त्यावेळी येथील वातावरण भक्तिमय झाले होते.

https://x.com/RRPSpeaks/status/1809559137778282646?s=19

पालखी सोहळ्यात रोहित पवार सहभागी

दरम्यान संत सोपानकाका पालखीच्या या गोल रिंगण सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे देखील सहभागी झाले होते. यावेळी रोहित पवार यांनी संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. याप्रसंगी रोहित पवारांनी संत सोपानकाकांच्या पालखीला खांदा दिला. तसेच त्यांनी उपस्थित वारकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी पालखीसोबत असलेल्या चहाच्या गाड्यावर जाऊन चहा घेतला. तसेच त्यांनी आपल्या सोबत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना चहाचा आग्रह देखील केला.

संत तुकारामांच्या पालखीचे बारामतीत आगमन

तत्पूर्वी, माऊली-माऊली नामाच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना आज पवित्र नीरा नदीत स्नान घालण्यात आले. यावेळी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आज पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश केला आहे. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सातारा जिल्ह्यातील लोणंदकडे मार्गस्थ झाली. तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज बारामती येथील शारदा विद्यालयाच्या प्रांगणात पालखीचा मुक्काम असणार आहे. त्यासाठी पालखीचे आज बारामती शहरात आगमन झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *