बजाज कंपनीने जगातील पहिली CNG बाईक केली लॉन्च!

पुणे, 05 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) बजाजने जगातील पहिली CNG बाईक फ्रीडम 125 भारतात लॉन्च केली आहे. या मोटारसायकलच्या लाँचिंग कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. या बाईकची सुरूवातीची किंमत 95,000 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. बजाज कंपनीने या बाईकच्या लुक आणि डिझाईनवर उत्तम काम केले आहे. त्यामुळे कंपनीने या बाईकमध्ये सीएनजी सिलिंडर कुठे ठेवला आहे? याचा तुम्हाला ही बाईकला पाहून देखील अंदाज येणार नाही. दरम्यान, केंद्रीय वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही या बाईकचे कौतुक केले आहे.

https://x.com/nitin_gadkari/status/1809174009268838745?s=19

इतकी किंमत असेल

बजाज फ्रीडम 125 सीएनजी बाईकच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, त्याची सुरुवातीची किंमत 95,000 रुपये आहे. त्याच्या Freedom 125 NG04 ड्रम LED या मॉडेलची किंमत 1,05,000 रुपये आहे. तर Freedom 125 NG04 डिस्क LED व्हेरियंटची किंमत 1,10,000 रुपये आहे. बजाज फ्रीडम 125 सीएनजी बाइकमध्ये दोन इंधन टाक्या आहेत. यात पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही इंधनाचा पर्याय आहे. ज्यामुळे तुम्ही पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही इंधनावर चालवू शकता. या दोघांचे नोझल वेगळे दिले आहेत.

सात रंगांच्या पर्यायात उपलब्ध

दरम्यान, कंपनीने दावा केला आहे की, ही बाईक पूर्ण टाकीच्या क्षमतेमध्ये 330 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम आहे. त्यानुसार, ही बाईक 1 किलो सीएनजीवर 102 किमी आणि 1 किलो पेट्रोलवर 67 किमी मायलेज देईल. बजाज फ्रीडम ही बाईक 7 रंगांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. ज्यामध्ये ही बाईक सायबर व्हाईट, कॅरिबियन ब्लू, एबोनी ब्लॅक-ग्रे, इबोनी ब्लॅक-रेड, प्युटर ग्रे-ब्लॅक, प्युटर ग्रे-यलो, रेसिंग रेड या रंगांमध्ये उपलब्ध असेल. या बाईकचे बुकिंग सुरू झाले असून, टप्प्याटप्प्याने ही बाईक देशातील विविध शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे.

हे फीचर्स मिळणार!

दरम्यान, बजाज ऑटोच्या पहिल्या सीएनजी मोटारसायकलचा लूक आणि फीचर्स याविषयी नेमकी माहिती लवकरच कळेल. परंतु, आतापर्यंत समोर आलेल्या सर्व माहितीनुसार, यामध्ये एलईडी लाईट्स, सिंगल पीस सीट सेटअप, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट असेल. क्लस्टर, यूएसबी फीचर्स जसे चार्जिंग पोर्ट आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यांसारखी फीचर्स उपलब्ध असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *