एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल, पहा कसे आहेत नवे दर?

दिल्ली, 01 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल केला आहे. त्यानुसार, आजपासून (दि. 01 जुलै) 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 30 रुपयांची कपात करण्यात आली आहे. याची माहिती तेल विपणन कंपन्यांनी दिली आहे. त्यामुळे देशातील व्यवसायिकांना जनतेला महागाई पासून काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतू, 14 किलो वजनाच्या एलपीजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

https://x.com/ANI/status/1807615174163022138?s=19

किती रुपयांना गॅस मिळणार?

या नवीन किमतीनुसार, दिल्लीत आता व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर 1676 रुपयांऐवजी 1646 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत हा एलपीजी गॅस सिलेंडर 1629 रुपयांवरून 1598 रुपयांना मिळणार आहे. तर हा सिलिंडर आता कोलकात्यात 1756 आणि चेन्नईमध्ये 1809.50 रुपयांना उपलब्ध आहे.

घरगुती गॅसचे दर जैसे थे!

दरम्यान, 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 9 मार्च 2024 रोजी शेवटचा बदल करण्यात आला होता. तेंव्हा घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 100 रुपयांनी कमी करण्यात आली होती. सध्या दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 803 रुपयांना मिळत आहे. त्याचवेळी घरगुती गॅस सिलिंडर मुंबईत 802.50 रुपयांना, कोलकात्यात 829 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये किमतीला विकले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *