ओम बिर्ला यांची पुन्हा एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड

दिल्ली, 26 जून: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी आज संसदेत मतदान झाले. यावेळी ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यामुळे ओम बिर्ला पुन्हा एकदा लोकसभेचे अध्यक्ष झाले आहेत. या निवडणुकीत ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. या निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी आणि सभागृहातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्याशी हस्तांदोलन करून त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत नेले. तसेच याप्रसंगी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी देखील एकमेकांशी हस्तांदोलन केले.

https://x.com/ANI/status/1805840902184910935

https://x.com/AHindinews/status/1805839674214334477?s=19

दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड

18 व्या लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे ओम बिर्ला यांची काँग्रेसचे खासदार के सुरेश यांच्याशी लढत होती. या निवडणुकीत एनडीएकडे असलेल्या बहुमतानुसार ओम बिर्ला यांनी विजय मिळवला. तर ओम बिर्ला यांनी यापूर्वी 17 व्या लोकसभेचे अध्यक्षपद भूषवले आहे. त्यावेळी त्यांची बिनविरोध निवड झाली होती. तर 18 व्या लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ही ओम बिर्ला यांची विजय मिळवल्याने ते पुन्हा एकदा लोकसभेचे अध्यक्ष झाले आहेत.

सरकार विरोधकात एकमत झाले नाही

तत्पूर्वी, लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी सरकार आणि विरोधकांमध्ये एकमत होऊ शकले नाही. त्यावेळी भाजप नेते राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे लोकसभा अध्यक्ष पदासाठी पाठिंबा मागितला होता. आम्ही अध्यक्षदासाठी पाठिंबा देऊ पण विरोधकांना उपाध्यक्षपद मिळायला हवे, अशी मागणी खरगे यांनी केली होती. त्यानंतर त्यांच्यातील बोलणी फिस्कटली. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीची घोषणा झाली. त्यानुसार लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांकडून ओम बिर्ला यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर विरोधी पक्षाकडून के. सुरेश यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *