सीईटी परीक्षेच्या निकालातील गोंधळावरून आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप

मुंबई, 21 जून: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील MH-CET 2024 या परीक्षेच्या निकालात गोंधळ झाल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यंदाच्या सीईटी परीक्षेतील पेपरमध्ये 1 हजार 425 आक्षेप घेण्यात आले. यातील प्रत्येक आक्षेपासाठी CET सेल 1000 रुपये आकारते आहे. या पेपर फेरतपासणीच्या नावाखाली सीईटी सेलने तब्बल 14 लाख 25 हजार कमावले आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे. या परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता यावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

https://x.com/ShivSenaUBT_/status/1804077176867959067?s=19

https://x.com/AUThackeray/status/1804110535266570459?s=19

https://x.com/ShivSenaUBT_/status/1804107853549937116?s=19

https://x.com/ShivSenaUBT_/status/1804118084975825390?s=19

पेपर सेट करणाऱ्यांचीच आधी परीक्षा घ्या

या सीईटीच्या पेपरमध्ये 54 चुका झाल्या आहेत. हे पेपर कोणी सेट केले? यामुळे ज्यांनी पेपर सेट केला त्यांचीच आधी परीक्षा घेतली पाहिजे. कारण हे पेपर सेट करण्यासाठी त्यांची योग्यता काय आहे? सीईटी सेलचे कमिश्नर कोण आहेत? त्यांचे अजून निलंबन का झाले नाही? एका पेपरमध्ये 54 चूका येऊ शकतात का? याचा विचार करणे आवश्यक आहे, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. सीईटीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे मार्क दिसत नाहीत, तर त्याची टक्केवारी दिसते. या टक्केवारीत देखील गोंधळ झाला आहे. काही ठिकाणी कमी मार्क मिळून देतील जास्त टक्के पडले आहेत. तर काही बॅचमध्ये चांगले मार्क पडून देखील कमी टक्केवारी मिळाली आहे. सीईटी सेलने ही टक्केवारी कशी ठरवली आहे? याचे उत्तर त्यांनी विद्यार्थ्यांना द्यावे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

https://x.com/ShivSenaUBT_/status/1804133854409556039?s=19

सीईटी परीक्षेत पारदर्शकता यावी

या संपूर्ण प्रक्रियेत फेरपरीक्षा नको पण पारदर्शकता यावी, विद्यार्थ्यांना जे मार्क आहेत ते दाखवावेत, त्यांच्या उत्तरपत्रिका द्याव्यात आणि जे टॉपर त्यांची नावे जाहीर करावीत. तसेच सीईटीच्या पेपरमध्ये ज्या 54 चूका झाल्या आहेत, त्याची फेरतपासणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जे 1000 रुपये भरले आहेत, ते पैसे विद्यार्थ्यांना परत करावे, अशी मागणी यावेळी आदित्य ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत केली. तसेच हा एक प्रकारचा घोटाळा देखील असू शकतो, जेणेकरून सीईटी सेलकडून जास्तीत जास्त चुका होतील आणि विद्यार्थ्यांनी फेतपासणीची मागणी केल्यावर सीईटी परीक्षेची जी एजन्सी आहे, तिला हे लाखो रुपये मिळतील, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. तसेच याप्रकरणात राज्य सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *