बारामतीचं विमान कोसळलं इंदापुरात

बारामती, 25 जुलैः बारामतीमधील कार्व्हर एव्हिएशनचे एक विमान इंदापुरातील कडबनवाडी येथील एका शेतात आज, 25 जुलै 2022 रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास कोसळले आहे. सदर विमान अपघातात मोठा अनर्थ टळला आहे. या अपघातात 22 वर्षीय वैमानिक भाविका राठोड ही जखमी झाली आहे. सध्या भाविका राठोड यांच्यावर शेळगाव येथील नवजीवन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.

दरम्यान, बारामती येथील कार्व्हर एव्हिएशनची प्रशिक्षण घेणारी वैमानिक भाविका राठोड यांनी आज, सकाळ बारामतीमधून विमानाने उड्डाण केले होते. मात्र विमानमधील इंधन संपल्याने ते इंदापूर तालुक्यातील कडबनवाडीमधील बारहाते यांच्या शेतात कोसळले. सदर घटनेची माहिती मिळताच आसपासच्या परिसरातील लोकांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली.

पोंदकुले वस्ती येथील तरुणांनी अपघातातील महिला वैमानिकाला त्वरीत मदत करत सुरक्षितपणे बाहेर काढले. अपघातात महिला वैमानिका भाविकाला किरकोळ जखमा झाल्याने त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कार्व्हर एव्हिएशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे पथक अपघात स्थळी दाखल झाले होते. सदर घटनेची व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या अपघातात मोठा अनर्थ होता होता टळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *