नरेंद्र मोदी यांनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ! शपथविधीला अनेक मान्यवरांची हजेरी

दिल्ली, 09 जून: (विश्वजीत खाटमोडे) नरेंद्र मोदी यांनी आज सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. हा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी सव्वासाच्या सुमारास पार पाडला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची तसेच गोपनीयतेची शपथ दिली. तसेच याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील जवळपास 60 हून अधिक नेते मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सध्या या मंत्र्यांचा देखील शपथविधी सुरू आहे.

https://twitter.com/AHindinews/status/1799802459000631403?s=19

या मान्यवरांची उपस्थिती 

राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्याला 7 देशांच्या प्रमुख नेत्यांशिवाय देशभरातील नेते, मुख्यमंत्री, खासदार, चित्रपट सेलिब्रिटी, उद्योगपती, संत यांसारख्या मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये अक्षय कुमार, शाहरुख खान, रजनीकांत, विक्रांत मेस्सी आणि राजकुमार हिरानी, अभिनेत्री रवीना टंडन यांचा समावेश आहे. रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी देखील नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. तसेच या भव्य सोहळ्याला शेजारील देशांतील नेते आणि मान्यवरांसह 8 हजारांहून अधिक लोक उपस्थित आहेत. याशिवाय नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे उपस्थित होते.

नरेंद्र मोदी बनले देशातील दुसरे नेते

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरेच भारतीय नेते आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1952, 1957 आणि 1962 च्या सार्वत्रिक निवडणुका जिंकून सलग तीन वेळा देशाचे पंतप्रधान पद भुषविले होते. तर नरेंद्र मोदी हे 2014, 2019 नंतर आता तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आहेत. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची घेतल्यानंतर आनंदी झालेल्या देशभरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आणि मिठाई वाटून जल्लोष साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *