चारधाम यात्रेसाठी भाविकांच्या संख्येत मोठी वाढ; भाविकांना ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक

उत्तराखंड, 31 मे: (विश्वजीत खाटमोडे) यंदा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तापासून चारधाम यात्रेला सुरूवात झाली आहे. चारधामला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येमध्ये आता मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. या पार्श्वभूमीवर, उत्तराखंड प्रशासनाने आज, 31 मे पर्यंत व्ही.आय.पी. दर्शन बंद केले आहे. चारधाम यात्रेसाठी सध्या भाविकांची वाढ झाली आहे. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसून येत आहे. ही गर्दी खूप जास्त असल्यामुळे तेथील सर्व प्रकारच्या व्यवस्थेवर ताण पडला आहे. याचा चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना त्रास होत आहे. भाविकांना या गर्दीचा त्रास होऊ नये, म्हणून उत्तराखंड प्रशासनाने सध्या देवाचे व्ही.आय.पी. दर्शन बंद केले आहे.

https://twitter.com/ddsahyadrinews/status/1796114882372243839?s=19

ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू

सध्या चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढतच असल्याच्या पार्श्वभूमीवर चारधाम येथील भाविकांच्या दर्शनाची प्रक्रिया सुरळीत पार पाडावी. तसेच भाविकांना कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये आणि त्यांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी उत्तराखंड शासनाने चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. यात्रेकरूंसाठी http://registrationandtouristcare.uk.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना त्यांच्या नावाची पूर्व नोंदणी करणे बंधनकारक आहे. ज्या तारखेसाठी भक्तांनी नोंदणी केली आहे, त्याच तारखेला भक्तांना चारधाम दर्शनाची परवानगी असेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मार्गदर्शक सूचना जारी

यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना उत्तराखंड सरकारच्या वैद्यकीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना https://health.uk.gov.in/pages/display/140-char-dham-yatra-health-advisory या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तरी यात्रेकरूंनी या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच वृद्ध आणि आजारी असलेल्या भाविकांनी चारधाम यात्रेला येण्याआधी त्यांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन देखील उत्तराखंड प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *