अहमदाबाद, 21 मे: (विश्वजीत खाटमोडे) आयपीएल मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघात पहिल्या क्वालिफायरमध्ये सामना खेळण्यात येणार आहे. हा सामना सायंकाळी 7.30 वाजल्यापासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकणारा संघ थेट 26 मे रोजी होणाऱ्या फायनलमध्ये पोहोचणार आहे. तर पराभूत संघाला एलिमिनेटरच्या विजेत्या संघाविरुद्ध सामना खेळून अंतिम फेरीत प्रवेश करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. यामुळे कोलकाता आणि हैदराबाद या दोन संघांमधील कोणता संघ सर्वप्रथम फायनलमध्ये प्रवेश करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/IPL/status/1792245698605335034?s=19
पाहा दोन्ही संघांचा रेकॉर्ड
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाने 14 पैकी 9 सामने जिंकले असून, केवळ 3 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद संघाने यंदाच्या स्पर्धेत 14 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 26 सामने झाले आहेत, ज्यामध्ये कोलकाता संघाने 17 सामने जिंकले, तर हैदराबादने 9 सामने जिंकले आहेत. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात एक सामना झाला होता. यामध्ये कोलकत्याने हैदराबादचा 4 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर आता हे दोन संघ थेट क्वालिफायरमध्ये सामना खेळणार आहे.
कोलकात्याला सलामीची चिंता
दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्यांचा अखेरचा सामना 11 मे रोजी खेळला होता. त्यांचे शेवटचे दोन सामने पावसामुळे वाहून गेले होते. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादचा संघ साध्या क्वालिफायर जिंकण्यासाठी एक मोठा दावेदार दिसत आहे. तसेच कोलकात्यासाठी दुसरी आणि महत्त्वाची अडचण म्हणजे त्यांचा तुफान फॉर्मात असलेला सलामीवीर फलंदाज फिल सॉल्ट हा मायदेशी म्हणजेच इंग्लंडला गेला आहे. त्यामुळे तो कोलकात्याच्या राहिलेल्या सामन्यांना मुकणार आहे. त्याची उणीव कोलकाता संघाला नक्कीच भासणार आहे. अशा परिस्थितीत आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स फिल सॉल्टच्या जागी रहमानउल्ला गुरबाज याला सलामीला खेळविण्याची शक्यता आहे.
कोलकाता नाइट रायडर्स संघ:-
रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, मनीष पांडे . नितीश राणा, श्रीकर भारत, शेरफान रदरफोर्ड, दुष्मंथा चमीरा, अंगक्रिश रघुवंशी, साकिब हुसेन, सुयश शर्मा, अल्लाह गझनफर आणि चेतन साकरीया.
सनरायझर्स हैदराबाद संघ:-
ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, अब्दुल समद, सनवीर सिंग, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, जयदेव उनाडकट, मयंक अग्रवाल, एडन मार्कराम, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र यादव, मयंक मार्कंडेय, जाटवेद सुब्रमण्यम, फजलहक फारुकी, मार्को जॉन्सन आणि आकाश महाराज सिंग.