मुंबई, 20 मे: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान पार पडले. राज्यातील 13 जागांवर आज मतदान झाले. या मतदानाची सायंकाळी 5 वाजेपर्यंतची आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. त्यानुसार, राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 48.66 टक्के इतके मतदान झाले आहे. याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. यामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्वाधिक सरासरी 57.06 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर कल्याणमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 41.70 टक्के इतके सर्वात कमी मतदान झाले आहे. दरम्यान ही आकडेवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंतची असून, अंतिम आकडेवारी जाहीर झाल्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/ddsahyadrinews/status/1792540962662621255?s=19
पाहा मतदानाची टक्केवारी
पाचव्या टप्प्यात धुळे लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 48.81 टक्के मतदान झाले आहे. तसेच नाशिक – 51.16 टक्के, दिंडोरी – 57.06 टक्के, ठाणे – 45.38 टक्के, कल्याण – 41.70 टक्के, पालघर – 54.32 टक्के, भिवंडी – 48.89 टक्के, मुंबई उत्तर – 46.91 टक्के, मुंबई उत्तर मध्य – 47.32 टक्के, मुंबई उत्तर पूर्व – 48.67 टक्के, मुंबई उत्तर पश्चिम – 49.79 टक्के, मुंबई दक्षिण – 44.22 टक्के आणि मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सरासरी 48.26 टक्के इतके मतदान झाले आहे.
https://twitter.com/AHindinews/status/1792535579344724046?s=19
कोणत्या राज्यांत किती टक्के मतदान?
त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज देशातील 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात मतदान पार पडले. या मतदानाची सायंकाळी 5 वाजेपर्यंतची आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. त्यानुसार, देशात आज 5 वाजेपर्यंत सरासरी 56.68 टक्के इतके मतदान झाले आहे. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 73 टक्के मतदान झाले आहे. याशिवाय बिहारमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 52.35 टक्के मतदान झाले आहे. तर जम्मू आणि कश्मीर – 54.21 टक्के, झारखंड – 61.90 टक्के, लडाख – 67.15 टक्के, महाराष्ट्र – 48.66 टक्के, ओडिशा – 60.55 टक्के, उत्तर प्रदेश – 55.80 टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये सरासरी 73 टक्के मतदान झाले आहे.