नेत्यांच्या अटकेविरोधात आम आदमी पार्टीचे आज भाजप मुख्यालयाबाहेर आंदोलन

दिल्ली, 19 मे: (विश्वजीत खाटमोडे) आम आदमी पक्षाचे अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले होते. मी उद्या दुपारी 12 वाजता माझ्या पक्षाचे सर्व नेते आणि आमदारांसह भाजप मुख्यालयात पोहोचत आहे. तुम्हाला ज्यांना तुरुंगात टाकायचे आहे, त्यांना तुरुंगात टाका, असे केजरीवाल म्हणाले होते. दरम्यान, आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या अटकेविरोधात आज आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली भाजप मुख्यालयाबाहेर आंदोलन करणार आहे.

https://twitter.com/AHindinews/status/1792080211649130847?s=19

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप

या पार्श्वभूमीवर, अरविंद केजरीवाल हे आज दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या पक्ष कार्यालयात पोहोचले आहेत. यावेळी केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर ‘ऑपरेशन झाडू’ चालवल्याचा आरोप केला आहे. मोदींना भेटलेल्या लोकांनी मला सांगितले होते, पंतप्रधान मोदी म्हणतात की, आप खूप वेगाने वाढत आहे आणि आगामी काळात आप राष्ट्रीय स्तरावर आणि अनेक राज्यांमध्ये भाजपला आव्हान देऊ शकते, त्यामुळे ‘आप’ला आव्हान बनण्याआधी त्याला चिरडणे आवश्यक आहे, असे पंतप्रधानांचे मत असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले आहे.

https://twitter.com/AHindinews/status/1792084225543553362?s=19

आप’ 140 कोटी लोकांच्या स्वप्नांचा पक्ष

भाजपला वाटते की अशा प्रकारे ते ‘आप’ला नष्ट करतील, ‘आप’ला नष्ट करतील. ला त्यांना सांगायचे आहे की, ‘आप’ हा काही मोजक्या लोकांचा पक्ष नाही. हा ‘आप’ 140 कोटी लोकांच्या स्वप्नांचा पक्ष आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये आम्ही जे काम केले आहे, ते या देशातील जनतेने गेल्या 75 वर्षांत पाहिले नाही. दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकारी शाळांच्या दुरुस्तीचे चांगले काम सुरू झाले, गरीब मुलांना चांगले शिक्षण मिळू लागले आहे. असे अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

विचारांना कसे अटक कराल?

पंतप्रधान मोदींना हे जमत नाही म्हणून त्यांनी आम्हाला थांबवून अटक करण्याचा निर्णय घेतला. तुम्ही त्यांच्या नेत्यांना अटक कराल. पण तुम्ही त्यांच्या विचारांना कसे अटक कराल? असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला. गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी भाजपने आमच्या नेत्यांना अटक करण्यास सुरूवात केली. त्यांनी मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांना अटक केली, काल माझ्या पीएलाही अटक करण्यात आली. मी पंतप्रधानांना सांगू इच्छितो की तुम्ही एक एक करून अटक करत आहात, आज आम्ही सगळे तुम्हाला अटक करण्यासाठी एकत्र येत आहोत, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. “आम्ही याठिकाणी पुरेशी व्यवस्था केली आहे, कलम 144 लागू आहे, आम्ही त्यांना थांबवले आहे आणि त्यांना निघून जाण्यास सांगितले आहे. येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असे दिल्ली मध्यवर्ती डीसीपी एम. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *