बारामती, 26 मार्चः बारामती नगर परिषद हद्दीमध्ये प्रभाग क्रमांक 14 मधील हरिकृपा या भागामध्ये डॉ. बोके यांच्या हॉस्पिटलपासून ते संघवी पार्ककडे जाणारा रस्ता विकसित करण्यात आला आहे. हा रस्ता तयार करण्यासाठीचा ठराव मंजुरीसाठी नगरसेवक संतोष जगताप यांनी सूचक म्हणून काम केले, तर अनुमोदक म्हणून नगरसेवक बिरजू मांढरे यांनी दिले.
या रस्त्याची किंमत 22 लाख 7 हजार 625 रुपये आहे. यासह या कामाच्या टेंडरला 16.35% कमी दरात मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे याची किंमत 19 लाख 50 हजार 269 ने मंजुरी दिलेली आहे. रस्त्याचे काम महालक्ष्मी कंट्रक्शन पुणे या ठेकेदाराने केले असून ते अतिशय निकृष्ट दर्जाचा तयार केलेला आहे. या कामावर तांत्रिक सल्लागार किकले असोसिएट यांनी देखरेख केली आहे. बारामती नगर परिषदेचे नगर अभियंता मोरे यांनी कामावर देखरेख न करता रस्ता तयार करून दिला. नगर अभियंता व तांत्रिक सल्लागार यांच्या हलगर्जीपणामुळे बारामती नगर परिषदेचे 19 लाख 50 हजार 269 रुपये पाण्यात बुडालेला आहे.
सदर रस्ता हा हाताने उकरत आहे. अशाप्रकारे महालक्ष्मी कंट्रक्शन पुणे या ठेकेदाराने बनवलेल्या अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्त्यामुळे बारामती नगरपरिषदेचे पैसे पाण्यात बुडालेले आहेत. सदर रस्ता हा लोक वस्तीसाठी तयार केलेला नसून तो बिल्डरला फायदा व्हावा, यासाठी बनवल्याचे दिसून येत आहे. या कामामुळे बारामती नगर परिषदेचे भ्रष्ट प्रशासन काम करत आहे का? हा प्रश्न यानिमित्ताने पुढे उपस्थित होत आहे.