बेंगळुरू, 18 मे: (विश्वजीत खाटमोडे) आयपीएल स्पर्धेत आज प्लेऑफ मध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात हा सामना रंगणार आहे. जो संघ या सामन्यात विजय मिळवणार, तोच संघ प्लेऑफ मध्ये दाखल होणार आहे. प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी आरसीबी आणि सीएसके संघांना विजय मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे सर्व क्रिकेप्रेमींचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/StarSportsIndia/status/1791325693910880627?s=19
दोन्ही संघांसाठी करो या मारो!
तत्पूर्वी, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हे तीन संघ प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. आता फक्त एका जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये आरसीबी आणि सीएसके हे दोन संघ शर्यतीत आहेत. यामध्ये चेन्नईचा संघ 14 गुण आणि 0.528 धावगतीसह मजबूत अवस्थेत आहे. प्लेऑफ मध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईला या सामन्यात केवळ विजय मिळवावा लागणार आहे. तर दुसरीकडे आरसीबीचे 12 गुण आहेत आणि त्यांची निव्वळ धावगती 0.387 अशी आहे. त्यामुळे या सामन्यात बंगळुरूला प्रथम फलंदाजी करताना 18 धावांच्या फरकाने चेन्नईवर विजय मिळवावा लागेल. जर बंगळुरूने दुसऱ्यांदा फलंदाजी केली तर त्यांना 18 षटकांत चेन्नईने उभारलेल्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी करा किंवा मरो सारखा आहे.
सामन्यावर पावसाचे सावट
चेन्नई आणि बेंगळुरू यांच्यातील आजचा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल. मात्र, या सामन्यात पावसाचा धोका आहे. चेन्नई आणि बेंगळुरू यांच्यातील सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजचा सामना जर पावसामुळे झाला नाही तर चेन्नईचा संघ थेट प्लेऑफ मध्ये दाखल होणार आहे. त्याचवेळी बेंगळुरूचे आव्हान तेथेच समाप्त होईल. त्यामुळे आजच्या सामन्यात पाऊस येऊ नये, अशी प्रार्थना बेंगळुरूचे चाहते करीत आहेत.
चेन्नईचा संघ:-
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, रिचर्ड ग्लीसन, सिमरजीत सिंग आणि महेश तिक्षिणा.
बेंगळुरूचा संघ:-
विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), स्वप्नील सिंग, करण शर्मा, लॉकी फर्ग्युसन आणि मोहम्मद सिराज.