पुणे, 19 जुलैः सोलापूर जिल्ह्याचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपासासाठी सदर गुन्हा सोलापुरातील सदर बाजार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
भीती वाटत असल्याने पीडित महिलेने पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून सदर गुन्हा वर्ग करण्यात आल्याची माहिती डेक्कन पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पीडित महिलेचा आरोप केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर श्रीकांत देशमुखांनी भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. सदर फिर्यादी पीडित महिला ही पुण्यातील आहे.
श्रीकांत देशमुखांनी महिलेला विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार केला. या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास महिला व तिच्या आईला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादींनी त्यांच्या जबाबात नमुद केले आहे.
श्रीकांत देशमुख यांच्यावर बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार, धमकावल्याप्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यातून आमच्याकडे गुन्हा वर्ग केला आहे. तो दाखलही करण्यात आल्याची माहिती सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी दिली.