दिल्ली, 10 मे: (विश्वजीत खाटमोडे) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर सुप्रीम कोर्टाने आज आज (दि.10) निकाल दिला आहे. त्यानुसार त्यांना सुप्रीम कोर्टाने 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना 2 जून रोजी कोणत्याही परिस्थितीत आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, दिल्ली दारू धोरण प्रकरणी त्यांना ईडीने 21 मार्च रोजी अटक केली होती. तेंव्हापासून केजरीवाल हे दिल्लीच्या तिहार कारागृहात आहेत.
सुप्रीम कोर्ट ने दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल को 1 जून तक अंतरिम जमानत दी और 2 जून को सरेंडर करने को कहा है। https://t.co/X5ZNyQDWBc
— ANI_HindiNews (@AHindinews) May 10, 2024
2 जूनपर्यंत जामीन मंजूर
तत्पूर्वी, अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत म्हणजेच 4 जूनपर्यंत जामीन देण्यात यावा, अशी मागणी त्यांचे वकील अभिषेक सिंघवी यांनी केली होती. मात्र, त्यांच्या वकिलांची ही मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावत केजरीवाल यांना 2 जूनपर्यंत जामीन मंजूर केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आजच्या सुनावणीत निवडणूक प्रचाराच्या आधारे केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यास विरोध केला होता. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना 21 दिवसांचा अंतरिम जामीन दिल्याने फारसा फरक पडणार नाही, असे म्हटले आहे.
कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण
दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने 1 जूनपर्यंत जामीन मंजूर केल्यामुळे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. केजरीवाल यांना आता जामीन मिळाल्याने ते 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करू शकतील. परंतु, मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल आपली अधिकृत जबाबदारी पार पाडू शकत नाहीत, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. तर अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आप ला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे.