पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीची याचिका ब्रिटनच्या कोर्टाने पाचव्यांदा फेटाळली

लंडन, 08 मे: (विश्वजीत खाटमोडे) पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी उद्योगपती नीरज मोदी याचा जमीन अर्ज ब्रिटनच्या कोर्टाने फेटाळून लावला आहे. नीरव मोदी गेल्या पाच वर्षांपेक्षा अधिक काळ लंडनच्या तुरूंगात आहे. पंजाब नॅशनल दीर्घ काळापासून तुरूंगात असल्याचे सांगत नीरवने गेल्या महिन्यात ब्रिटनच्या कोर्टात जमिनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टाने त्याची ही याचिका फेटाळली आहे. विशेष म्हणजे, ब्रिटनच्या कोर्टाने नीरव मोदीची जामीन याचिका पाचव्यांदा फेटाळून लावली आहे.

पाच वर्षांपासून जेलमध्ये

नीरव मोदी गेल्या पाच वर्षांपासून लंडनच्या तुरूंगात कैद आहे. त्याने नव्याने जामिनासाठी अर्ज केला होता. तो फरार होण्याचा जास्त धोका असल्यामुळे ब्रिटनच्या न्यायाधीशांनी त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे नीरव मोदी याला मोठा धक्का बसला आहे. ब्रिटनच्या वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात त्याच्या जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान तो हजर झाला नाही. पण त्याचा मुलगा आणि दोन मुली हे यावेळी कोर्टात हजर होते.

नीरव मोदी कर्ज बुडवून फरार

दरम्यान नीरव मोदी हा पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहे. त्याने 2018 मध्ये पंजाब नॅशनल बँकेकडून सुमारे 14 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु, हे कर्ज बुडवून तो ब्रिटनला पळून गेला होता. याप्रकरणी ईडी आणि सीबीआयने त्याच्या विरोधात अनेक खटले दाखल केले आहेत. तसेच या प्रकरणात नीरव मोदी याच्या विरोधात भारतात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सध्या त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बँक घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *