बनावट व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कडक कारवाई करा, नरेंद्र मोदींची निवडणूक आयोगाकडे मागणी

सातारा, 29 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा एक बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या बनावट व्हिडिओत अमित शाह हे आरक्षणाबाबत वादग्रस्त विधान करताना दिसत आहेत. मात्र त्यांचा हा व्हिडीओ खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, अमित शाह यांचा बनावट व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाकडे अशा लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

https://twitter.com/AHindinews/status/1784911248100065508?s=19

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

“21 वे शतक हे तंत्रज्ञानावर आधारित आहे, मी त्याला नेहमीच पाठिंबा दिला आहे. पण ज्यांना भाजप, एनडीएशी समोरासमोर मुकाबला करता येत नाही ते मुद्द्यांवर, कृतीच्या आधारे आता खोटे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवत आहेत. ते फेक व्हिडिओ पसरवून आमच्या पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या आवाजाला आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. या फेक व्हिडीओपासून समाजाला वाचवणे हा आमचा धर्म आहे. मी निवडणूक आयोगाला विनंती करतो की, या लोकांवर कडक कारवाई करावी,” असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. ते सातारा येथील प्रचारसभेत बोलत होते.

https://twitter.com/AHindinews/status/1784905586439754161?s=19

https://twitter.com/AHindinews/status/1784907104786239537?s=19

मोदींची साताऱ्यात जाहीर सभा

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा मतदारसंघातील भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज साताऱ्यात जाहीर सभा पार पडली. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, “भाजपने 2013 मध्ये मला पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केल्यावर मी रायगड किल्ल्यावर गेलो आणि कुठलेही काम सुरू करण्यापूर्वी तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर ध्यान करत बसलो. त्यावेळी मला जी प्रेरणा आणि उर्जा वाटली त्यांचा मला आशीर्वाद मिळाला. त्यांचे आभार मानून मी गेली 10 वर्षे तेच आदर्श विचार जगण्याचा प्रयत्न करत आहे.” आजही जगात जेव्हा जेव्हा नौदलाची चर्चा होते, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले जाते. मात्र इतकी वर्षे स्वतंत्र भारताच्या नौदलाच्या ध्वजावर ब्रिटिशांचे चिन्ह होते. एनडीए सरकारने ते चिन्ह काढून टाकले आणि त्याजागी छत्रपती शिवाजी महाराजांचे चिन्ह लावले, असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *