मुंबई, 16 जुलैः दलित पँथरचे संस्थापक आणि आंबेडकरी चळवळीचे विचारवंत नेते दिवंगत राजा ढाले यांती आज, 16 जुलै रोजी तृतीय स्मृतीदिनी आहे. यानिमित्त रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी विक्रोळी येथील ढाले यांच्या निवासस्थानी जाऊन दिवंगत राजा ढाले यांना अभिवादन केले.
तसेच दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त दलित पँथर चळवळीत भरीव योगदान दिलेल्या पँथरच्या कुटुंबियांना सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्याचा संकल्प ना. रामदास आठवले यांनी केला आहे. ते सन्मानचिन्ह दिवंगत राजा ढाले यांच्या कुटुंबियांना आज ना.रामदास आठवले यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी दिवंगत राजा ढाले यांच्या पत्नी दीक्षा ढाले, मुलगी गाथा ढाले आणि नातू उन्नयन तसेच रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, गौतम सोनवणे, बाळासाहेब गरुड, सुरेश भालेराव, वैशाली संगारे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.