हनुमान जन्मोत्सव निमित्त बारामतीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

बारामती, 24 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) देशभरात काल हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बारामती शहरात देखील हनुमान जन्मोत्सव निमित्त काल विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हनुमान जन्मोत्सव निमित्त श्री मोरया सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शुभम गोपी पडकर यांच्यावतीने बारामतीच्या अनाथ शाळेतील गोरगरीब मुलांना जेवण देण्यात आले. याप्रसंगी, शुभम गोपी पडकर यांचे सहकारी मित्र अमर पवार, गणेश पवार, साहिल सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.



तसेच बारामती शहरात काल अखिल वडार समाज आमराई, बारामती यांच्यावतीने हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अखिल वडार समाज आमराई यांच्यावतीने नागरिकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला परिसरातील लहान मुले, तरूण आणि लोकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. तर हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अखिल वडार समाज आमराईचे अध्यक्ष अनिल इटकर यांच्यासह अनिल चव्हाण, अविनाश चव्हाण, नितिन शिंदे, चेतन शिंदे, आकाश चव्हाण, आकाश पवार, लक्ष्मण धोत्रे, संतोष पवार, लखन माने, महादेव माने, लहू ननावरे, संभाजी चव्हाण, अतोष धोत्रे, काळू चव्हाण, विशाल शिंदे, सुनील शिंदे, साहिल पवार, गोपाल बनपट्टे, कृष्णा धोत्रे, शुभम काकडे, प्रणव बनप‌ट्टे, स्वप्निल शिंदे, विशाल जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *