लॉकअपमधून पळून गेलेला आरोपी अखेर जेरबंद

इंदापूर, 15 जुलैः इंदापूर तालुक्यातील कळंब येथे स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलीस स्टेशन यांच्या पथक लॉकअपमधून पळून गेलेल्या आरोपीला सापळा रचून अटक केली आहे. सदर आरोपीकडून फोर्ड इकॉस्पोर्त एम एच 31 एफ इ 0032 ही जप्त करण्यात आली.

दरम्यान, शिक्रापूर पोलीस स्टेशनमधून 22 जून 2022 रोजी रात्री 2 च्या सुमारास भादवी कलम 457, 380 गुन्ह्यातील आरोपी रोहन उर्फ बंटी सोनटक्के (वय 22, रा. मुरूम ता. उमरगा जि. उस्मानाबाद) लॉकअपमधून पळून गेला. सदर प्रक पोरणाचे गांभीर्य लक्षात घेत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी सूचना देत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमले. पोलिसांनी तपास यंत्रणाना वेगाने फिरवत सदर प्रकरणातील आरोपी इंदापूर तालुक्यातील कळंब येथे असल्याची माहिती मिळाली. सदर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलीस स्टेशनचे पथकाने सापळा रचून आरोपीस कळंब येथून मोठ्या शर्तीने पकडले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या सूचनेनुसार पुण्याचे अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, शिरूर विभागचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनात पो.स. इ. गणेश जगदाळे, सहा, फौजदार बाळासाहेब कारंडे, पोलीस हवालदार अजित भुजबळ, पोलीस नाईक अमोल शेडगे, पोलीस नाईक अभिजीत एकशिंगे, पोलीस नाईक स्वप्नील अहिवळे, तसेच शिरूर पोलीस स्टेशनचे पो.स.इ. अभिजीत पवार, पोलीस नाईक जगताप यांनी केली आहे.

निरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *