डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बारामतीत कोल्ड्रिंक्सच्या बॉटल्सचे वाटप

बारामती, 15 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) देशात काल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काल देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण देशात काल बाबासाहेबांची जयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काल रात्री महाराष्ट्रासह देशभरातील अनेक ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. यावेळी भीम अनुयायींमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.



दरम्यान, बारामती शहरात देखील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सालाबादप्रमाणे बारामती शहरातील क्रांतीसिह विश्वनाथ (दादा) गालिंदे चौकात काल 3500 कोल्ड्रिंक्सच्या बॉटल्सचे वाटप करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन चैतन्य गालिंदे यांच्यावतीने करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे संविधान प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले.



या कार्यक्रमाला बारामती काँग्रेसचे युवक अध्यक्ष योगेश महाडिक, बारामती नगरपरिषदेचे माजी नगरसेवक संतोष गालिंदे, माजी नगरसेवक निलेश इंगुले, बारामती सहकारी बँकेचे संचालक विजय गालिंदे, श्रीकांत गालिंदे, गणेश गालिंदे, सुमित गालिंदे, गोकुळ गालिंदे, चैतन्य गालिंदे, प्रतिक जोजारे, ब्रिजेश गालिंदे, अजय गालिंदे, संदीप गालिंदे, अभय गालिंदे, निखिल गालिंदे, अमित सोनवणे आणि सार्थक पलगे यांच्यासह विविध मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *