डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे अनुयायींची मोठी गर्दी

मुंबई, 14 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) भारताचे उद्‍धारक, प्रज्ञासूर्य, महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 133 वी जयंती आहे. देशभरात मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरातील शाळा, महाविद्यालये तसेच कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे देशात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादर परिसरातील चैत्यभूमी येथे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायींनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.

https://twitter.com/airnews_mumbai/status/1779368144768791030?s=19

बीएमसीकडून जोरदार तयारी

या पार्श्वभूमीवर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी येथील स्मारक, राजगृह येथील त्यांचे निवासस्थान आणि आजूबाजूच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दादर येथील चैत्यभूमी येथील सोयी सुविधांची जोरदार तयारी केली आहे. महानगरपालिकेच्या वतीने याठिकाणी अनुयायींसाठी नियंत्रण कक्ष, वैद्यकीय सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, शौचालयांची व्यवस्था यांसारख्या अनेक सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

चैत्यभूमीवर आकर्षक फुलांची सजावट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला आकर्षक अशी विविध फुलांनी सजावट करण्यात आली आहे. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज चैत्यभूमी येथे हजारों भीम अनुयायींसह अनेक राजकीय नेत्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक येथे प्रशासनाच्या वतीने बाबासाहेबांच्या छायाचित्रांची आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *