डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा डिझेल टाकून जाळली

इंदापूर, 11 एप्रिलः पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामधील भवानीनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा डिझेल टाकून जाळली, असा अनुचित प्रकार हा 11 एप्रिल 2024 रोजी सकाळी घडला आहे. सदरची कृत्य हे मराठा समाजातील व्यक्ती अशोक हनुमंत निचळ याने केलेले आहे, असे घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी सांगितले आहे. हा व्यक्ती गाडीवर तलवार व बाटलीमध्ये डिझेल घेऊन येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा जाळली आहे. सदरचे घटना पाहून काही आंबेडकरी अनुयायांनी विजवण्यासाठी गेले असता अशोक हनुमंत निचळ यांनी तलवार काढून त्यांच्या अंगावर धावून गेला व त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे घटनास्थळी असलेले लोक सांगत आहेत.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात सुरू होत असताना अशा प्रकारचे कृत्य केले जात आहे. ही निंदनीय घटना आहे, असे आंबेडकर अनुयायी सांगत आहे. यावर मराठा समाज निषेध करणार का? असे आंबेडकर अनुयायी बोलत आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांची सुद्धा आज (गुरुवारी) जयंती आहे. परंतु याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा का जाळली? यामागे मोठा कट असल्याचे लोक सांगत आहेत.

तसेच आज रमजान ईद सारखा मोठा सण आहे. त्यामुळे दंगली घडवण्याचे षडयंत्र तर नाही ना? असे लोकांकडून सांगितले जात आहे. हे कृत्य करणारा व्यक्ती अशोक हनुमंत निचळ भिक्षा मागतो व त्या व्यक्तीची मानसिकता नीट नाही, असे मराठा समाजातील व्यक्तीकडून बोलले जात असल्याचे समजत आहे. त्या व्यक्ती विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व शस्त्र अधिनियम यानुसार गुन्हा नोंदवला गेला असल्याचे समजले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *