मुंबई, 14 जुलैः राज्यात होऊ घातलेल्या 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 स्थगित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने 8 जुलै 2022 रोजी नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावर सुनावणी सुरु आहे. येत्या 19 जुलै 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीनंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे सर्व क्षेत्रात जाहीर करण्यात आलेली आचार संहिताही आता संपुष्टात आलेली आहे. या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने परिपत्रक जाहीर केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या परिपत्रकामुळे बारामती नगर परिषदे अंतर्गत होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूक 2022 सुद्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नगर परिषदेच्या हद्दीतील आचार संहिताही संपुष्टात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी आरक्षणावरील सुनावणीनंतरच पुढील आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, अशी माहिती बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी ‘भारतीय नायक’शी बोलताना सांगितले.