बारामती येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टीचा कार्यक्रम पार पडला

बारामती, 07 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) बारामती शहरातील गुनवडी चौकातील पान गल्ली येथे पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन फुल अँड फायनल ग्रुप बारामती यांच्या वतीने करण्यात आले. हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात व उत्साहपुर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील हजेरी लावली. तसेच सदर कार्यक्रमाला बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, फलटण, अकलूज येथील मुस्लिम समाजातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती.



यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी समस्त मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या व येणाऱ्या रमाजन ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मिशन दंगा मुक्त महाराष्ट्र चे सुब्हान अली शेख सर यांनी उपस्थित नागरिकांना रोजा म्हणजे काय असतो? याबाबतची माहिती दिली. या इफ्तार पार्टी कार्यक्रमाचे आयोजन फुल अँड फायनल ग्रुप बारामती यांच्या वतीने करण्यात आले असून, ग्रुपच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले होते.

सदर इफ्तार पार्टी कार्यक्रमाला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष महेबुबभाई शेख, बारामती ॲग्रो लि. चे चेअरमन राजेंद्र पवार, विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार, शेख सुब्हान अली सर, सदाशिव सातव, जवाहर वाघोलीकर, सुभाष ढोले, संदिप गुजर, सत्यव्रत काळे, अस्लम तांबोळी, प्रदिप जगदाळे, बापू तोरसकर, पप्पु शेख तसेच बारामती परिसरातील मुस्लिम समाजातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *