बारामती, 3 एप्रिलः (वृत्त संपादक सम्राट गायकवाड) बारामती लोकसभेच्या उमेदवारी जाहीर झाली आणि बारामती लोकसभा उमेदवार शरद पवार गट सुप्रिया सुळे यांचे नाव घोषित झाले. सुप्रियाताई या 2009 पासून लोकसभा लढवत आहेत. 2009 ते 2024 पर्यंत बारामती मध्ये त्यांनी कधीही लक्ष घातले नाही. मतदारसंघ तर सोडाच परंतु बारामतीच्या दलित वस्तीमध्ये त्या कधीही फिरकल्या नाहीत. बारामतीमध्ये कोणत्याही समाजाच्या अडचणी जाणून घेतल्या नाही. परंतु कुटुंबीयांमध्ये दोन गट पडले, तेव्हा ताईंना अचानक बदल होतो व बारामतीमधील अण्णाभाऊ साठे नगरला त्यांना अचानक भेट द्यावीशी वाटली.
बारामती शहराचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु बारामतीमध्ये दलित वस्तीचा भकास त्याचप्रमाणे होत आहे. बारामतीमध्ये अण्णाभाऊ साठेनगरला कोणतीही प्रकारची सुविधा नाही. तेथील शौचालय अतिशय घाण आहे. त्यामध्ये कुठलीही स्वच्छता केली जात नाही, असे स्थानिकांमध्ये वारंवार सांगण्यात येत आहे. आजपर्यंत कोणत्याही स्थानिक आमदाराने व साहेबांनी याकडे अजिबात लक्ष दिले नाही. ताईंना मतदारसंघांमध्ये व दलित वस्तीमध्ये अचानक कसे काय यावे से वाटले? असा प्रश्न मतदार करत आहे. या निवडणुकीच्या अगोदर ताई कधीही भेटायला आल्या नाही. उलट ताई प्रत्येकाला उर्मटपणे बोलायच्या, असे मतदार सांगत आहे. परंतु अतिशय दुर्गंधीयुक्त ठिकाणी ताई सभा घेतात, असा अचानक बदल ताईंमध्ये कसा होतोय? असे अण्णाभाऊ साठे नगरमधील मतदार बोलत आहे.
अण्णाभाऊ साठे नगरमध्ये नगरसेवक कधी आलेला नाही, त्यांच्या समस्या कधी जाणून घेतले नाही. तर आमदार, खासदार तर सोडाच त्यामुळे तेथील नागरिक ताई आमच्याकडे कसे काय आल्या? अशी चर्चा चालू आहे. ताई आमच्या भावनांची तर खेळत नाही ना? अशी माहिती ‘भारतीय नायक’शी बोलताना स्थानिकांनी सांगितली आहे.