बारामती येथील शॉपिंग कॉम्प्लेक्सचे काम युद्धपातळीवर सुरू

बारामती, 31 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) बारामती शहरातील व्यापाऱ्यांना छोटे मोठे व्यवसाय करता यावेत, यासाठी बारामती नगरपरिषदेच्या वतीने कमी दराच्या भाडेपट्ट्यावर गाळे बांधण्यात येणार आहेत. बारामती शहरातील इंदापूर चौकात हे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात येत आहे. पुढील वर्षी या शॉपिंग कॉम्प्लेक्सचे काम पूर्ण होणार आहे. या कामाची गती सध्या वाढविण्यात आली आहे. दरम्यान, ह्या कॉम्प्लेक्समध्ये जवळपास 200 गाळे असणार आहेत. या कामासाठी बारामती नगरपरिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत 48 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.

पुढील वर्षापर्यंत शॉपिंग कॉम्प्लेक्स पूर्णत्वास

दरम्यान बिजनेस मॉल यासारखे अनेक सुविधा ठेकेदार ए व्ही टी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत हे काम चालू असून, बारामतीकरांसाठी या गाळ्यांचे वाटप लवकरच म्हणजे 2025-26 पर्यंत होईल, असे साईटचे इंजिनियर व ठेकेदार यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या निमित्ताने बारामती नगरपालिकेच्या वैभवात अजून एका नवीन शासकीय इमारतीची भर पडणार आहे.

अनेक व्यापाऱ्यांना फायदा होणार

बारामती येथील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी कमी दराच्या भाडेपट्ट्यावर व्यावसायिक गाळे, कॉम्प्लेक्स मॉल भाडेतत्त्वावर बारामती नगरपरिषद देणार आहे. हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, ए व्ही टी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने या कॉम्प्लेक्सच्या कामाची गती वाढवून हे काम गतिशील केले आहे. तर हे शॉपिंग कॉम्प्लेक्स पूर्ण होऊन, लवकरच ते बारामतीकरांना व्यापारासाठी खुले होणार आहे. याचा फायदा बारामती शहरातील नागरिकांना होणार आहे. त्यामुळे बारामतीकर सध्या आनंदीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *