नवी दिल्ली, 12 जुलैः सर्वोच्च न्यायालयात ओबीसी राजकीय आरक्षण संदर्भात महत्त्वाची सुनावणी आज, 12 जुलै 2022 रोजी महत्त्वाची सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारकडून ओबीसींसंदर्भात अहवाल सादर केला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाची सुनावणी पुढे ढकली आहे. यामुळे उद्या, 13 जुलै (बुधवार) 2022 रोजी ओबीसी आरक्षणावर पुन्हा सुनावणी होणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारला बांठिया आयोगाने इम्पिरिकल डेटा सादर केला आहे. हा इम्पिरिकल डेटा राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. या इम्पिरिकल डेटावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणावर फैसला होणार आहे. दरम्यान, ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या.खानविलकर आणि न्या.पारडी वाला यांच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी सुरु आहे.