ममता बॅनर्जी अपघातात गंभीर जखमी, डोक्याला दुखापत

कोलकाता, 14 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा अपघात झाला आहे. या अपघातात ममता बॅनर्जी गंभीर जखमी झाल्या आहेत. यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. यासंदर्भातील माहिती तृणमूल काँग्रेसने ट्विट करून दिली आहे. यावेळी तृणमूल काँग्रेसने ममता बॅनर्जी यांचे हॉस्पिटलमधील फोटो शेयर केले आहेत. या फोटोत ममता बॅनर्जी यांच्या कपाळातून रक्त आल्याचे दिसत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे लोक ममता बॅनर्जी यांना बरे वाटावे म्हणून प्रार्थना करीत आहेत.

https://twitter.com/AITCofficial/status/1768286010264502610?s=20

कसा झाला अपघात?

ममता बॅनर्जी यांच्यावर कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ममता बॅनर्जी यांचा अपघात कसा झाला? याबाबत तृणमूल काँग्रेसने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी या त्यांच्या निवासस्थानी असताना पडल्यामुळे जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना एसएसकेएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ममता बॅनर्जी यांच्या कपाळावर डॉक्टरांनी टाके टाकून रक्तस्त्राव थांबवण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात ही अपघात झाला होता

तत्पूर्वी, ममता बॅनर्जी यांचा गेल्याच महिन्यात कार अपघात झाला होता. त्यावेळी देखील त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. दुसरी गाडी मध्ये आल्यामुळे त्यांच्या कार चालकाने अचानकपणे कारचा ब्रेक लावल्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला होता. तेंव्हा ममता बॅनर्जी या कारमध्ये ड्रायव्हरच्या शेजारी बसल्या होत्या. त्यावेळी त्यांचे कपाळ समोरच्या काचेवर आदळले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *