शिंदे दाम्पत्यासह नवले दाम्पत्यांना मिळाला महापुजेचा मान

पंढरपूर, 10 जुलैः पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढीएकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली. आषाढी एकादशी वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. वारकऱ्यांना सोयी-सुविधामध्ये शासन कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख, समृद्धी येण्यासाठी कोरोनासह सर्व अडचणी दूर कर,असे साकडे एकनाथ शिंदेंनी यावेळी विठ्ठला चरणी घातले

राज्यात कृषी, उद्योग, शिक्षण आणि आरोग्यासह सर्व क्षेत्रात चांगली कामे केली जाणार आहे. विकासाचा लाभ समाजातील प्रत्येक घटकाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. शासन सर्वसामान्यांचे आहे, ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचे प्रयत्न राहतील असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मानाचे वारकरी मुरली भगवान नवले आणि जिजाबाई नवले (मु.पो. रुई, ता.गेवराई, जि.बीड) या दाम्पत्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. तसेच वारकरी दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.

मानाच्या वारकऱ्यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून वर्षभरासाठी देण्यात येणाऱ्या मोफत एसटी पासचे वितरण मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते ‘रिंगण’ या वारी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य- मुख्यमंत्री शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *