लग्नाहून परतत असलेली कार कालव्यात पडली; तिघांचा मृत्यू, तिघे बेपत्ता

बुलंदशहर, 04 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) उत्तर प्रदेशातील बुलंदशहर मध्ये लग्न समारंभातून परतणारी एक इको कार पावसामुळे कालव्यात पडली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून, तीन जण अद्याप बेपत्ता आहेत. तर या अपघातात दोन जण जखमी झाले असल्याचे म्हटले जात आहे. या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना काल रात्री घडली. एका लग्न समारंभातून परतत असताना पावसामुळे ही इको कार कालव्यात पडली. या कारमध्ये 8 जण प्रवास करीत होते.

https://twitter.com/AHindinews/status/1764478596767174815?s=19

लग्न समारंभातून परतत होते

ते सर्वजण इको कारमधून शेखपुरा येथील लग्न समारंभातून अलीगढ पिसावा येथे परतत होते. त्यावेळी त्यांची ही कार पावसामुळे बुलंदशहरच्या जहांगीरापूर पोलीस स्टेशन हद्दीतील कपना कालव्यात पडली. त्यात 3 जणांचा मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर 3 जण अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, ते या अपघाताचा तपास करीत आहेत. पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसेच एमडीआरएफची टीम याठिकाणी बचावकार्यासाठी तैनात करण्यात आली आहे. सध्या येथे बचावकार्य सुरू असून, बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे.

https://twitter.com/myogiadityanath/status/1764294444503961798?s=19

मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाखांची मदत

दरम्यान, या दुर्घटनेबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त करीत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. “उत्तर प्रदेशातील ही जीवितहानी अतिशय दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत तात्काळ देण्याच्या आणि मदतकार्य जलदगतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तुमचे सरकार प्रत्येक परिस्थितीत तुमच्या पाठीशी उभे आहे,” असे ट्विट योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *