गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगल्या प्रकरणी तिघांना अटक

पुणे, 01 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) बेकायदेशीरपणे गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. नामदेव ढेबे (22), आकाश कदम (23) आणि जय दयाडे (19) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 1 गावठी पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तर लोखंडी धातूचे देशी बनावटीच्या या पिस्टलची किंमत 50,000 रुपये, तर 2 जिवंत काडतुसे यांची 500 रुपये इतकी किंमत आहे.



सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर व पोलीस स्टाप असे गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना पुण्यातील धायरी परिसरातील रायकरमळा येथे 3 अज्ञात व्यक्ती गावठी पिस्टल घेवून थांबले असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांना हे तिघे उभे असल्याचे दिसले. त्यांना चाहुल लागताच ते पळुन जाऊ लागले. मात्र, पोलिसांनी या तिघांना त्यांचा पाठलाग करुन त्यांना काही अंतरावर पकडले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. सध्या त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.



ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पुणे शहर पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 संभाजी कदम, सिंहगडरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आप्पासाहेब शेवाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार सचिन गायकवाड, प्रकाश पाटील, राजु वेगरे, स्वप्निल मगर, विनायक मोहिते, मोहन मिसाळ, विजय विरणक योगेश उदमले यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *