मुंबई, 18 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येत्या 19 फेब्रुवारी रोजी पुणे शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. याची माहिती पुणे वाहतूक पोलिसांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येत्या 19 फेब्रुवारी रोजी पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील लक्ष्मीरोड, शिवाजीरोड वरून मिरवणूका निघत असतात. या मिरवणुकींना नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 19 फेब्रुवारी रोजी पुणे शहरातील प्रामुख्याने बाजीराव रोड, कुमठेकर रोड, केळकर रोड व इतर रोडवर वाहतूक वाढून सदर रोडवर वाहतुकीची कोंडी होऊन वाहतुक संथ होण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/PuneCityTraffic/status/1758844092837142884?s=19
या पार्श्वभूमीवर, 19 फेब्रुवारी रोजी पुणे शहरातील सबंधित ठिकाणी वाहतूकीत बदल करण्याचा निर्णय पुणे शहर वाहतूक पोलीस उप आयुक्त शशिकांत बोराटे यांनी घेतला आहे. त्यानूसार, अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता पुण्यातील नेहरु रोड, लक्ष्मी रोड, शिवाजी रोड, बाजीराव रोडवरील सर्व प्रकारच्या वाहतूकीत 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजल्यापासून गर्दीसंपेपर्यंत बदल करण्यात आला आहे. या संदर्भातील परिपत्रक वाहतूक विभागाने जारी केले आहे.
या भागांतील वाहतुकीत बदल केला
1) जिजामाता चौक येथुन शिवाजी रोड वरुन स्वारगेटला जाणारे वाहन चालकांसाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक टिळक चौक – टिळक रोडने इच्छितस्थळी जातील.
2) गणेश रोड – दारुवाला पुलाकडुन फडके हौद चौक, जिजामाता चौकाकडे येणारी वाहतुक ही दारुवाला पुल चौकातुन इच्छितस्थळी जातील.
3) केळकर रोडने अप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी मंदीर चौक मार्गे बुधवार चौकाकडे येणारी वाहतुक आवश्यकते नुसार वळविण्यात येईल.
4) मिरवणुक लक्ष्मी रोडवर असताना सोन्या मारुती चौक पास होईपर्यंत आवश्यकतेनुसार लक्ष्मी रोड वरील वाहने संत कबीर चौक समर्थ विभाग हद्दीतुन वळविण्यात येईल.
5) पुरम चौकातुन बाजीराव रोडवरुन शिवाजीनगरकडे जाणा-या वाहन चालकांसाठी पुरम चौकातून टिळक रोडने अलका टॉकीज चौक व पुढे एफ. सी. रोडने इच्छितस्थळी जातील.
6) मिरवणुका सुरू झाल्यानंतर आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे व बाजीराव रोडने फुटका बुरुजकडे न जाता सर्व वाहने केळकर रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जातील.
7) मिरवणुका गाडगीळ पुतळा पास होऊन जाणार नाहीत तोपर्यंत सर्व वाहने सावरकर भवन पुलावरुन बालगंधर्व बाजुकडे किंवा टकले हवेली चौकामार्गे इच्छितस्थळी जातील.
8) मिरवणुका गाडगीळ पुतळा पास होईपर्यंत वाहने शनिवार वाड्याकडे न जाता ती कॉसमॉस बँक जंक्शन, सावरकर भवन पुल ते बालगंधर्व, टिळक पुलमार्गे मनपाकडे किंवा टकले हवेली मार्गे इच्छितस्थळी जातील.
9) स. गो. बर्वे चौकातुन पुणे मनपा भवनकडे जाणारे वाहन चालकांनी स. गो. बर्वे चौकातुन जंगली महाराज रोडने झाशी राणी चौक डावीकडे वळुन इच्छित स्थळी जातील.