दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमजवळ भीषण अपघात; बांधलेला मंडप अचानकपणे कोसळला

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये मंडप कोसळल्याची घटना घडली आहे. ही दुर्घटना आज सकाळी घडली. यामध्ये 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याचा सध्या पोलीस तपास करीत आहेत. या घटनेमुळे त्याठिकाणी एकच खळबळ उडाली होती.

https://x.com/ANI/status/1758739630017438001?s=20

गेट क्रमांक 2 जवळ घडली दुर्घटना

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आज सकाळी बांधलेला मंडप कोसळला. बांधलेला मंडप अचानकपणे खाली पडल्यामुळे या अपघातात 8 जण जखमी झाले आहेत. या स्टेडियमच्या गेट क्रमांक 2 जवळ हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच, दिल्ली पोलिसांचे पथक आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर झाल्या. यावेळी त्यांनी जखमींना बाहेर काढून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे सांगितले जात आहे.

कामगार नाश्ता करण्यासाठी गेल्याने मोठा अनर्थ टळला

दरम्यान, सुदैवाने या दुर्घटनेत कोणाचाही मृत्यू झालेला नाही. हा अपघात झाला तेव्हा बहुतेक कामगार नाश्ता करण्यासाठी गेले होते. नाहीतर याठिकाणी मोठी दुर्घटना घडली असती. अग्निशमन दलाचे पथक ढिगाऱ्याखाली कोणी दबले आहे का? याचा सध्या शोध घेत आहे. तर आता याठिकाणी पडलेल्या मंडपाचा भाग हटविण्याचे काम सुरू आहे. काही लोक येजा करीत असताना त्यांचा या मंडपाला धक्का लागला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *