अजित पवारांना मोठा धक्का; धनगर नेता सुप्रिया सुळेंच्या भेटीला!

बारामती, 19 फेब्रुवारीः लोकसभा निवडणुकांआधी अजित पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. हा धक्का अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या बारामती मतदार संघातच बसला आहे. लवकरच हा धनगर नेता शरद पवार गटात शामील होणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. हा धनगर नेत्याने दिल्ली येथे बारामती मतदार संघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे.

24 लाख कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व सोडले – प्रकाश आंबेडकर

बारामती मतदार संघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला विधानसभा मतदार संघ येतात. यातील दौंड, इंदापूर आणि बारामती विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात धनगर मतदार आहेत. त्यामुळे धनगरांचे एकहाती मतदान हे बारामती लोकसभा मतदार संघाचा खासदार ठरविण्यात मोठं योगदान करत असतात. पुर्वीपासूनच शरद पवार आणि सध्या अजित पवार यांनी धनगर नेत्यांना जवळ केले आहे. दौंड विधान सभा मतदार संघातील धनगर मतदार सोडले तर इतर दोन तालुक्यातील धनगर समाजाचे मतदान हे पुर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले आहे. मात्र आता परिस्थिती ही वेगळी आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट तयार झाले असून बारामती लोकसभा मतदार संघातील मतदार देखील संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे मतदान कोणाला करायचे? हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

 

लोकसभा निवडणूक आधी जास्तीत जास्त समाजाचे नेते जवळ करण्याचा मानस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटाकडून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे चित्र आहे. यात आता लोकसभा निवडणुकीअगोदरच धनगर समाजाच्या मोठा नेत्याने दिल्ली येथे शरद पवार यांच्या गटाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर अजित पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

राज्यभरात उद्यापासून विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार! सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती

सदर धनगर नेता कोण? त्याने अजित पवारांशी का साथ सोडली? हे येत्या काही दिवसात समजेल. मात्र येणाऱ्या लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर येणारी विधान सभा निवडणूक ही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीत खुप चुरशीच्या ठरणार आहेत, यात तिळ मात्र शंका राहणार नाही. या निवडणुकींमध्ये बाजी कोण मारते? याकडे सर्वसामान्य बारामतीकरांसह राज्याचे ही लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *