श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या व्हॉईस चेअरमनपदी बाळासाहेब कामथे यांची निवड

सोमेश्वरनगर, 02 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) बारामती तालुक्यातील श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर या साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी श्री. बाळासाहेब ज्ञानदेव कामथे यांची निवड झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार त्यांची आज श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे.

पुरंदर तालुक्यातील खळद येथील श्री. बाळासाहेब ज्ञानदेव कामथे यांची आज श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या व्हॉईस चेअरमनपदी निवड झाली आहे. त्यांचे नाव बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री संभाजीनाना होळकर यांनी आज जाहीर केले. यावेळी श्री. सोमेश्वर साखर कारखान्याच्या व्हॉईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल बाळासाहेब कामथे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

याप्रसंगी, श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर चे चेअरमन श्री.पुरुषोत्तमदादा जगताप, मावळते व्हाईस चेअरमन सौ.प्रणिताताई खोमणे, कार्यकारी संचालक श्री.राजेंद्र यादव, माजी चेअरमन व विद्यमान संचालक श्री.राजवर्धनदादा शिंदे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी त्यांनी बाळासाहेब ज्ञानदेव कामथे यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *