मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज; सहा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई, 02 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) मागील काही दिवसांपासून धमकीचे फोन आणि मेसेज येण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज आला आहे. मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवले असल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर मुंबई पोलीस सध्या हा मेसेज पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.

https://twitter.com/ANI/status/1753245749025075323?s=19

मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा संदेश आला आहे. संपूर्ण मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे या संदेशात म्हटले आहे. या संदेशानंतर मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तर हा संदेश पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. यासंदर्भातील माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

अशा घटनांमध्ये वाढ होत चालली आहे

तत्पूर्वी, गेल्या काही दिवसांपासून धमकीचे मेसेज फोन किंवा इमेल येण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत चालली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना देखील धमकीचे मेसेज आले होते. अनेकदा असे फोन किंवा मेसेज बनावट असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनेकांना अटक देखील केली आहे. तर अशाप्रकरच्या धमकीचे फोन किंवा मेसेजच्या घटनांमुळे पोलिसांचे काम विनाकारण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *