राज्यात थंडी वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज

पुणे, 30 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) येत्या काही दिवसांत राज्यातील तापमानात घट होण्याची गरज असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडी वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे येत्या 3 फेब्रुवारीपर्यंत उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि कोकण या भागांत कमाल आणि किमान तापमानात होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

https://twitter.com/anupamkashyapi/status/1752283222078361749?s=19

कमाल आणि किमान तापमानात घट होणार

येत्या पाच ते सात दिवसांत संपूर्ण राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र त्याचवेळी 31 जानेवारीनंतर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच येत्या 72 तासांत संपूर्ण राज्यातील आकाश निरभ्र राहील. तसेच पहाटेच्या सुमारास धुके पडण्याची शक्यता आहे. तसेच येत्या 2 ते 3 दिवसांत कमाल आणि किमान तापमानात अंदाजे 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

थंडी अशीच कायम राहणार!

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश ठिकाणी थंडीचे वातावरण आहे. राज्यात सध्या सकाळी आणि रात्रीच्या तापमानात घट होत आहे. थंडी वाढल्यामुळे अनेक ठिकाणी सध्या लोक शेकोट्या पेटवत असल्याचे दिसून येत आहे. तसेच काही ठिकाणी सकाळी दाट धुके पडत आहेत. तर येत्या काही दिवसांत उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील काही ठिकाणी तपमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांना येत्या काही दिवसांत देखील थंडी अनुभवता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *