मनोज जरांगे पाटील यांच्या कोणकोणत्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या?

मुंबई, 27 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाची लढाई जिंकले आहेत. राज्य सरकारने मराठा आरक्षण संदर्भातील अध्यादेश मध्यरात्रीच काढला आहे. त्यानंतर जरांगे पाटील यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले. त्यामुळे राज्यभरात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मराठा बांधव सध्या फटाके वाजवून आणि मिठाई वाटून हा आनंद साजरा करीत आहेत. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने आपल्या कोणकोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत, याची माहिती दिली.

जरांगे पाटील यांच्या या मागण्या मान्य!

* नोंदी मिळालेल्या सर्व मराठा बांधवांच्या परिवारास कुणबी प्रमाणपत्र तातडीने देण्यात आले पाहिजे, ही मागणी सरकारने मान्य केली आहे.
* शिंदे समिती रद्द करू नये, ही मागणी देखील मान्य करण्यात आली आहे. दरम्यान शिंदे समितीला टप्प्याटप्प्याने मुदतवाढ मिळणार आहे.
* राज्यभरात कुणबीच्या 54 लाख नोंदी मिळाल्या आहेत. त्यापैकी राज्य सरकारने 37 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिले आहे. तसेच कुणबी प्रमाणपत्र कोणाला दिले? याचा डेटा सरकारने द्यावा, ही मागणी मान्य करण्यात आली आहे.
* अंतरवाली सराटीसह मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी देखील मान्य करण्यात आली आहे.
नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, ही मागणी देखील सरकारने मान्य केली.
* क्युरेटिव पिटीशनचा विषय सुप्रीम कोर्टात आहे. ते आरक्षण मिळेपर्यंत आणि मराठा समाजातील सर्व मुलामुलींना शंभर टक्के शिक्षण मोफत करण्यात यावे, ही मागणी देखील आता मान्य करण्यात आली आहे.
* मराठा आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करू नये आणि भरती केली तर मराठा समाजाच्या जागा राखीव ठेवण्याची मागणी मान्य झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *