बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत 97.37% मतदान

बारामती, 28 एप्रिलः बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणूक 2023 ते 2028 साठी आज, 28 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. बारामतील तालुक्यातील 7 मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदान केंद्रात बारामती (1 अ) आणि बारामती (1 ब), सुपे, उंडवडी सुपे, जळगांव क. प., पणदरे. सांगवी, निरावागज आदींचा समावेश होता. या मतदान केंद्रावर एकूण 97.37% मतदान झाले आहे.

संचालक मंडळ निवडणुकीत दडपशाही!

सोसायटी मतदार संघात एकूण मतदान 1613 होते. त्यापैकी 1572 मतदारांनी मतदान केले. या मतदार संघात एकूण 97% मतदान झाले.

ग्रामपंचायत मतदार संघात एकूण 551 मतदान होते. त्यापैकी 549 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदार संघात एकूण 99.6% मतदान झाले.

व्यापारी व आडते मतदार संघात एकूण 265 प्रत्यक्ष मतदान होते. त्यापैकी 243 मतदारांनी मतदान केले. या मतदार संघात 92% मतदान झाले.

हमाल व मापाडी मतदार संघात एकूण 199 मतदान होते. त्यापैकी 195 मतदारांनी मतदान करून आपला हक्क बजावला. या मतदार संघात 98% मतदान झाले आहे.

बारामती शहरासह परिसरातील लॉजची पोलिसांकडून चेकिंग

कृषि उत्पन्न बाजार समिती बारामती सर्व मतदार संघाचे एकूण 2628 मतदान होते. त्यापैकी 2559 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. उद्या 29 एप्रिल 2023 रोजी सकाळी 9 वाजता रयत भवन, मार्केट बारामती येथे मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तसेच मतमोजणी संपल्यानंतर त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृतचा रयत पॅनल तर भाजप- शिवसेनेचा पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल यांच्या लढत पहायला मिळाली. मात्र या मतदानात काही अपक्ष उमेदवारांमुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला हादरे बसणार का, की पुन्हा राष्ट्रवादीची एक हाती सत्ता येणार, याचे चित्र निकालानंतर समजणार आहे.

One Comment on “बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत 97.37% मतदान”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *