बारामती, 5 जूनः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा नुकताच निकाल जाहीर केलेला आहे. यात बारामती तालुक्यातील मूर्ती गावातील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मूर्ती शाळेचा 96 टक्के निकाल लागलेला आहे. तसेच या शाळेतील मुलींनी गेल्या दोन ते तीन वर्षातील पहिला नंबर आणण्याची परंपरा कायम ठेवलेली आहे.
शाळेत प्रथम तीन क्रमांक मिळवलेले विद्यार्थी-
सिद्धीका सतीश बालगुडे 90.80%
श्रावणी मुकिंदा कारंडे 85.80%
गणेश आप्पा गिरी 85.80%
हर्षिता सोपान गदादे 85.20%
इंग्रजी माध्यमिक विद्यालयाची 100 टक्के निकालाची परंपरा कायम
शाळेतील सिद्धीका सतीश बालगुडे या विद्यार्थिनींचा वर्गामध्ये पहिला नंबर आलेला आहे. तिला 90. 80% इतके मार्क मिळाले आहेत. तसेच दुसरा क्रमांक श्रावणी मुकिंदा कारंडे व गणेश आप्पागिरी यांना 85.80% इतके मार्क्स मिळालेले आहे. तिसरा क्रमांक हर्षिता सोपान गदादे हिला मिळाला असून 85.20% इतके मार्क्स मिळालेले आहे. इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचं मूर्ती ग्रामस्थांसह रयत शिक्षण संस्थेमधील सर्व शिक्षक वृंदांकडून अभिनंदन होत आहे.
ग्रामपंचायत आणि पंचायत समितीविरोधात भाजपकडून उपोषणाचा इशारा
One Comment on “श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचा 96 टक्के निकाल”