बारामतीत 900 हेक्टर जमीन घोटाळा?

बारामती, 18 ऑगस्टः बारामती तालुक्यात 1989 साली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) स्थापन करण्यात आले. ही औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी बारामती शहरापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रुई, वंजारवाडी, तांदूळवाडी आणि कटफळ परिसरातील बळी राजाच्या जमिनी काही ठिकाणी 10 ते 13 हजार रुपये एकर तर काही ठिकाणी 26 हजार रुपये एकर या काडीमोल भावाने तब्बल 900 हेक्टर जमीन ताब्यात घेण्यात आल्या. सदर जमिनींमध्ये आराखडा तयार करून औद्योगिक निवासी, व्यापारी भूखंड पाडण्यात आले.

बारामती शहर पोलिसांची कॉलेज आवारात कारवाई

त्यापैकी निवासी विभागात अनाधिकृतपणे महामंडळाने निवासी भूखंडाचे वाटप केले आहे. बांधकाम व्यवसायकांनी अनेक खोटी कागदपत्रे तयार करून भूखंडांवर ताबा मिळविला आहे. औद्योगिक क्षेत्रात काहीही काम न करणाऱ्या व्यक्तींना भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे. परंतु हक्काचा असणारा एकही गुंठा अनेक बळीराजांना देण्यात आलेला नाही.

बानपच्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं ‘देवमाणूस’चं दर्शन

सदर प्रकरणात बारामतीचे नेतृत्व स्वतः लक्ष घालून प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करून घेतील का? सदर प्रकरणात बारामतीच्या बळी राजाला खरंच न्याय मिळेल का? का सदर प्रकरण राजकीय दबावात दाबण्याचा प्रयत्न होईल?

सदर प्रकरणातील अधिक माहिती पुढील अंकात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

क्रमशः………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *