बारामती, 6 जूनः बारामती शहरात 5 जून 2022 रोजी संध्याकाळी 7 वाजता 47 मिमी साध्या सरीचा पाऊस पडला. या पावसामुळे बारामती नगर परिषद हद्दीतील विविध भागांमध्ये पावसाळी गटारे तूबुन पाणी सखल भागांमध्ये साचले. मान्सून पूर्व गटारांची कामे केलेली नाहीत, तर ठेकेदार योगेश काशिनाथ हिंगणे यांनी 9 कोटी 19 लाखांची पावसाळी गटारांची कामे नियोजन शून्य व निकृष्ट दर्जाच्या केली. यामुळे अनेक गोरगरीबांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उघड्यावर पडले. पाण्याचा नियमित निचरा होत नसल्यामुळे मैलायुक्त मिश्रित आणि घाण पाणी झोपडपट्ट्यांमध्ये घुसले.
दरम्यान, शहरातील गटारी साफ करण्याच्या कामाला 29 जानेवारी 2021 रोजी सुरू करण्यात आले. तर काम संपण्याची मुदत ही 30 जानेवारी 2022 ला पूर्ण झाली आहे. आज पर्यंत हे काम पूर्ण झाले नाही. याबाबत अभिजीत कांबळे यांनी बारामती नगरपालिकेकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच विलंब शुल्क प्रतिदिन प्रमाणे वसूल करावा व नियोजन शून्य व निकृष्ठ दर्जाच्या कामाची चौकशी करावी. त्याचबरोबर पावसाळ्यात जेथे जेथे पाणी साचते, अशा ठिकाणी शासकीय ऑडिट करावे, अशी मागणी अभिजीत कांबळे यांनी केली आहे.