मतदानाच्या हक्कासाठी खर्च केले तब्बल 80 हजार!

बारामती, 19 डिसेंबरः बारामती तालुक्यातील तब्बल 13 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 नुसार 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान पार पडले. बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीत एकूण 83.66 टक्के मतदान पार पडले. मोठ्या उत्साहाने ग्रामस्थांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे. मात्र मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी एका दांपत्याने पदरचे 80 हजार रुपये खर्च केला आहे. हे वाचून नवलच वाटलं असेल, पण हे खरं आहे. ही बारामती तालुक्यातील गरदडवाडी गावातील आहे.

बारामतीत घरफोडी; साडेसात लाखांच्या ऐवजावर डल्ला

बारामती तालुक्यातील गरदडवाडी येथील सचिन गोकुळ लकडे हे दुबई देशातील शाह विमानतळावर नोकरीला आहेत. ते मुळचे बारामतीच्या गरदडवाडी गावातील आहे. सध्या गावात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 लागली आहे. या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते आपल्या पत्नी सरिता लकडे यांच्यासह दुबईहून गरदडवाडी गावात आले. त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

मात्र या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांना दुबई ते गरदडवाडी आणि गरदडवाडी ते दुबई प्रवासासाठी तब्बल 80 हजार रुपयांचा खर्च आला आहे. मात्र असे असले तरी गाव कारभाराची धुरा योग्य व्यक्तींकडे जावी, यासाठी मतदान करण्यासाठी आलो असल्याची भावना त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

बारामतीत शांततेत मतदान; आता लक्ष निकालाकडे!

2 Comments on “मतदानाच्या हक्कासाठी खर्च केले तब्बल 80 हजार!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *