नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात 71 मंत्र्यांचा समावेश! पाहा संपूर्ण यादी

दिल्ली, 10 जून: (विश्वजीत खाटमोडे) नरेंद्र मोदी यांनी काल देशाच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींशिवाय 71 मंत्र्यांनीही मंत्रीपद आणि गोपीनीयतेची शपथ घेतली. यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र प्रभार असलेले 5 राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. मोदी यांच्या मंत्रिमंडळात भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांचे 11 मंत्री आहेत. दरम्यान, 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात 45 मंत्र्यांनी, तसेच 2019 मध्ये मोदी यांच्या मंत्रिमंडळात 57 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आता तब्बल 71 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.

कॅबिनेट मंत्र्यांची नावे

यामध्ये अमित शाह, नितीन गडकरी, जेपी नड्डा, शिवराज सिंह, निर्मला सीतारामन, एस जयशंकर, मनोहर लाल खट्टर, एचडी कुमारस्वामी, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान, जीतन राम मांझी, राजीव रंजन उर्फ ललन सिंह, सर्बानंद सोनेवाल, डॉ. वीरेंद्र कुमार, राम मोहन नायडू, प्रल्हाद जोशी, जुआल ओराँव, गिरीराज सिंह, अश्विनी वैष्णव, ज्योतिरादित्य सिंधिया, भूपेंद्र यादव, गजेंद्र सिंह शेखावत, अन्नपूर्णा देवी, किरण रिजिजू, हरदीप पुरी, मनसुख मांडविया, जी किशन रेड्डी, चिराग पासवान, सीआर पाटील या नेत्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

राज्यमंत्र्यांच्या नावाची यादी

तसेच राव इंद्रजीत सिंह, जितेंद्र सिंह, अर्जुन राम मेघवाल, प्रतापराव गणपतराव जाधव, जयंत चौधरी यांनी स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. सोबतच जितीन प्रसाद, श्रीपाद यशो नाईक, पंकज चौधरी, कृष्णपाल गुर्जर, रामदास आठवले,रामनाथ ठाकूर, नित्यानंद राय, अनुप्रिया पटेल, व्ही सोमन्ना,चंद्रशेखर पेम्मासानी, एसपी सिंह बघेल, शोभा करंदलाजे, कीर्तिवर्धन सिंग, बीएल वर्मा, शंतनू ठाकूर, सुरेश गोपी, एल मुर्गन, अजय तमटा, बंदी संजय, कमलेश पासवान, भगीरथ चौधरी, सतीश दुबे, संजय सेठ, रवनीत सिंग बिट्टू, दुर्गादास सुईके, रक्षा खडसे, सुकांता मजुमदार, सावित्री ठाकूर, टोखान साहू, राजभूषण चौधरी, श्रीनिवास वर्मा, हर्ष मल्होत्रा, नीमुबेन बांभनिया, मुरलीधर मोहोळ, जॉर्ज कुरियन, पवित्रा मार्गेरिटा या नेत्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *