फुटबॉल मैदानावर लोखंडी पत्रा कोसळून 7 मुले जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

ठाणे, 22 जून: (विश्वजीत खाटमोडे) ठाण्यातील फुटबॉल मैदानावर शुक्रवारी रात्री लोखंडी पत्रा कोसळून 7 मुले जखमी झाल्याची घटना घडली आहे. या जखमी मुलांना उपचारासाठी ठाण्यातील बेथनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 4 मुलांची प्रकृती ठीक असून 3 मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे काल रात्री पावणे बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. त्यावेळी या मैदानावर जवळपास 18 मुले फुटबॉल खेळत होती. दरम्यान, या घटनेच्या सविस्तर चौकशीचे आदेश ठाणे महानगरपालिकेने दिले आहेत.

https://x.com/ANI/status/1804236398633062620?s=19

https://x.com/AHindinews/status/1804234363808419946?s=19

प्रताप सरनाईक यांनी घेतली रुग्णांची भेट

या दुर्घटनेनंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक जखमी मुलांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी या मुलांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी या मुलांच्या प्रकृती विषयी डॉक्टरांकडून माहिती घेतली. प्रताप सरनाईक यांनी या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली आहे. या दुर्घटनेतील पीडित कुटुंबाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सर्व मुलांवर चांगले उपचार केले जातील, असे प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

अशी घडली घटना

तत्पूर्वी, ठाण्यातील एका फुटबॉल क्लबमध्ये काल रात्री जवळपास 18 मुले फुटबॉल खेळत होती. त्यावेळी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे दुसऱ्या सोसायटीचा लोखंडी पत्रा उडून मुलांच्या अंगावर पडला. या घटनेत 7 मुले जखमी झाली असून, त्यातील 3 मुलांची प्रकृती गंभीर आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *