मुंबई, 9 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर केला आहे. त्यानुसार, एसटी कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळीत प्रत्येकी 6 हजार रुपयांचा बोनस मिळणार आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना ही दिवाळी भेट दिली आहे. याबाबतची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. मात्र एसटीचे अनेक कर्मचारी 6 हजारांच्या या बोनसवर नाराज झाले आहेत. तर गेल्या वर्षी एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये इतका दिवाळी बोनस देण्यात आला होता.
राज्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना
तत्पूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज एक बैठक पार पडली. या बैठकीला एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी एसटी संघटनांनी कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये दिवाळीचा बोनस देण्यात यावा, अशी मागणी केली होती. मात्र सरकारने त्यांची ही मागणी अमान्य करत 6 हजार रुपये इतका दिवाळी बोनस जाहीर केला. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये काहीशी नाराजी आहे.
बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
तसेच एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन देण्यासंदर्भात 30 नोव्हेंबर रोजी राज्य सरकार बैठक घेणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. याशिवाय, 30 नोव्हेंबरच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करणे, घरभाडे भत्ता आणि वेतन वाढीच्या दराची थकबाकी देणे यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान आजच्या बैठकीत एसटी महामंडळाला स्व-मालकीच्या गाड्या खरेदी करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने यावर्षी 900 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात रस्त्यांवर एसटीच्या नवीन बसेस धावताना दिसणार आहेत.
One Comment on “एसटी कर्मचाऱ्यांना 6 हजारांचा दिवाळी बोनस जाहीर”